मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत व मार्गदर्शक गटविकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळी नजिक गावात महिलांसाठी ॲनेमिया तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे वडाळी नजिक गाव ॲनेमियामुक्त करण्याचा निर्धार सन्माननीय सरपंच श्रीमती सीमाताई सुभाषराव होळकर यांनी व्यक्त केला.
या शिबिरात आरोग्यवर्धिनी केंद्र, कोकणगाव येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती रूपाली भूषण आहेर, ए.एन.एम. श्रीमती रीना शंकर थेपाणे,आरोग्यसेवक तसेच आशा वर्कर श्रीमती कविता जगताप व श्रीमती जिजा लिलके यांनी महिलांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन दिले. ग्रामपंचायत अधिकारी संजय मते व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी शिबिराची संपूर्ण जबाबदारी सांभाळली.
शिबिरात ॲनेमियाचे दुष्परिणाम, त्यावरील उपाययोजना, आहारातील लोहयुक्त पदार्थांचे महत्त्व, तसेच महिलांनी आरोग्याविषयी जागरूक राहण्याची गरज याबाबत उपस्थित महिलांना माहिती देण्यात आली.