शिक्षण विभाग
शिकूया, घडवूया, प्रगती करूया
वडाळी नजिकमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाच्या दृष्टीने पहिली ते चौथीपर्यंत शाळा उपलब्ध आहे. शाळेचे नाव ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडाळी नजिक’ असे आहे. ‘डिजिटल इंडिया’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत, वडाळी नजिकमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता अधिक आधुनिक झाली आहे. वडाळी नजिकच्या ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे ही शाळा डिजिटल करण्यात आली आहे. या शैक्षणिक बदलामुळे, विद्यार्थ्यांना दोन नवीन एल.ई.डी. टीव्हीच्या मदतीने अद्ययावत शिक्षण देणे शक्य झाले आहे, ज्यामुळे शिकणे अधिक सोपे आणि प्रभावी झाले आहे.
या शाळेच्या पायाभूत सुविधांमध्येही मोठी सुधारणा झाली आहे. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असून, मुलामुलींसाठी स्वच्छ आणि आधुनिक शौचालये बांधून दिलेली असून, त्यात हँडवॉश आणि स्वच्छ पाण्यासारख्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये ‘चाइल्ड फ्रेंडली’ (घसरगुंडी, झोका इत्यादी) युक्त सुविधा उपलब्ध आहेत. शाळेच्या इमारतीला नवीन रंगरंगोटी करण्यात आली असून,आवश्यक फर्निचर (खुर्च्या व बाकडे) देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी दोन नवीन वर्गखोल्यांचे बांधकामही सध्या सुरू असून, यामुळे अधिक प्रशस्त जागा उपलब्ध होईल. शाळेतील बोलक्या भिंती देखील रंगविण्यात आल्या आहेत.
या भौतिक सुविधांसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरही लक्ष केंद्रित केले जात आहे. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नियमितपणे केली जाते आणि मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शाळेतच स्वयंपाक करण्याची व्यवस्था आहे. शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले असून, लवकरच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले जाणार आहेत. या सर्व बदलांमुळे शाळेचे कामकाज अधिक सुरक्षित व पारदर्शक झाले असून, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी नजिक येथील - शिक्षकवृंद
अ.क्र | शिक्षकाचे नाव | मो.नं. | फोटो |
---|---|---|---|
१ | श्री. अभिमन उत्तम भामरे | ९५२७३७८०९७ | ![]() |
२ | श्री. संतोष पुंडलिक जाधव | ९४०४५६७७९८ | ![]() |
३ | श्री. प्रकाश छबुराव कदम | ९०२८१९२०९५ | ![]() |
विद्यार्थी कल्याणकारी योजना
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडाळी नजिक शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी पहिला गणवेश वाटप सविस्तर अहवाल
अ.क्र | अनुसूचित जाती | अनुसूचित जमाती | भटक्या विमुक्त जमाती | बिगर मागास |
---|---|---|---|---|
१ | मुले ०३ | २६ | ०६ | ०३ |
२ | मुली ०२ | १८ | ०९ | ०४ |
३ | एकूण ०५ | ४४ | १५ | ०७ |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडाळी नजिक शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी दुसरा गणवेश वाटप सविस्तर अहवाल
अ.क्र | अनुसूचित जाती | अनुसूचित जमाती | भटक्या विमुक्त जमाती | बिगर मागास |
---|---|---|---|---|
१ | मुले ०३ | २६ | ०६ | ०३ |
२ | मुली ०२ | १८ | ०९ | ०४ |
३ | एकूण ०५ | ४४ | १५ | ०७ |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडाळी नजिक शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पहिला गणवेश वाटप सविस्तर अहवाल
अ.क्र | अनुसूचित जाती | अनुसूचित जमाती | भटक्या विमुक्त जमाती | बिगर मागास |
---|---|---|---|---|
१ | मुले ०३ | २७ | १० | ०३ |
२ | मुली ०२ | १५ | ०६ | ०२ |
३ | एकूण ०५ | ४२ | १६ | ०५ |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडाळी नजिक शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी दुसरा गणवेश, बूट व सॉक्स वाटप सविस्तर अहवाल
अ.क्र | अनुसूचित जाती | अनुसूचित जमाती | भटक्या विमुक्त जमाती | बिगर मागास |
---|---|---|---|---|
१ | मुले ०४ | २७ | १० | ०३ |
२ | मुली ०२ | १५ | ०६ | ०२ |
३ | एकूण ०६ | ४१ | १६ | ०५ |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडाळी नजिक शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पहिली ते चौथी वर्गासाठी मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा अहवाल
अ.क्र | अनुसूचित जाती | अनुसूचित जमाती | भटक्या विमुक्त जमाती | बिगर मागास |
---|---|---|---|---|
१ | मुले ०३ | २७ | १० | ०३ |
२ | मुली ०२ | १५ | ०६ | ०२ |
३ | एकूण ०५ | ४२ | १६ | ०५ |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडाळी नजिक सुवर्ण शिष्यवृत्ती सन २०२३-२०२४ वाटप अहवाल
अ.क्र | पात्र लाभार्थी | आलेली रक्कम | वाटप केलेली रक्कम | शेरा |
---|---|---|---|---|
१ | ४७ | ४७००० | ४७००० | प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा केली |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडाळी नजिक सुवर्ण शिष्यवृत्ती सन २०२३-२०२४ वाटप अहवाल
अ.क्र | पात्र लाभार्थी | आलेली रक्कम | वाटप केलेली रक्कम | तपशील | शेरा |
---|---|---|---|---|---|
१ | ४४ | ४४००० | ४४००० | अनुसूचित जमाती मुले व मुलींसाठी | प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा केली |
शालेय पोषण आहार मेन्यू कार्ड
अ.क्र | दिवस | पहिला आणि तिसरा आठवडा | दुसरा आणि चौथा आठवडा |
---|---|---|---|
१ | सोमवार | वटाणा पुलाव | सोया पुलाव |
२ | मंगळवार | वटाणा मसाले भात | मसूर पुलाव |
३ | बुधवार | वटाणा मटार पुलाव | अख्खा मूग आमटी भात |
४ | गुरुवार | मूग डाळ खिचडी | मटकी भात |
५ | शुक्रवार | चवळी खिचडी | मूग डाळ खिचडी |
६ | शनिवार | चणा पुलाव | तूर वरण भात |
अशाप्रकारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडाळी नजिक येथील विद्यार्थ्यांना योग्य आणि आधुनिक शिक्षण मिळावे, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांना मूलभूत पालनपोषणाची जोड मिळावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना चांगले शिक्षण घेण्याला प्राधान्य द्यावे, या उद्देशाने ग्रामपंचायत वडाळी नजिकने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना यशस्वीरित्या राबवल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षणाच्या दृष्टीने भविष्यात अजूनही नवीन सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत वडाळी नजिक कटिबद्ध आहे.




















