वडाळी नजिक येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावागावांत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून गावातील स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन रॅली काढून ग्रामस्थांमध्ये जागृकतेचा संदेश दिला. या रॅलीच्या माध्यमातून शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात, तसेच गावोगाव वातावरणनिर्मिती व्हावी, हा उद्देश ठेवण्यात आला होता.
या उपक्रमात जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडीतील सेविका आणि कर्मचारी, ग्रामस्थ, महिला व पुरुष बचत गटांचे पदाधिकारी, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य यांचाही सहभाग होता. रॅलीदरम्यान महिलांनी घोषणाबाजी करून योजनांची माहिती घराघरांत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी सन्माननीय सरपंच श्रीमती सीमाताई सुभाषराव होळकर, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती वैशाली कराटे, श्रीमती वैशाली कडाळे, ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री सुभाषराव होळकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री संजय मते, सीआरपी यमुना दोबाडे, महिला व पुरुष बचत गटांचे अध्यक्ष, सचिव, जि.प. शाळेचे सन्माननीय शिक्षक उपस्थित होते.