अंगणवाडी विभाग
अंगणवाडी हे ग्रामीण भागातील एक महत्वाचे बालविकास आणि आरोग्य सेवा केंद्र आहे. याचे मुख्य उद्दिष्ट ६ वर्षांखालील मुलांचे पोषण, आरोग्य आणि मानसिक विकास सुनिश्चित करणे आहे. अंगणवाडी “एकात्मिक बाल विकास सेवा” योजनेचा एक भाग आहे, जी भारत सरकारने १९७५ मध्ये सुरू केलेली आहे.
अंगणवाडीचे मुख्य कार्य
बालकांचे आरोग्य आणि पोषण
६ वर्षांखालील मुलांना पूरक पोषण आहार देतात, त्यांचे वजन मोजतात आणि त्यांच्या वाढीचा आलेख तयार करतात.
लसीकरण आणि आरोग्य तपासणी
नियमित लसीकरण मोहिमांमध्ये भाग घेतात आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करतात.
संदर्भ सेवा
गंभीर कुपोषित किंवा आजारी बालकांना पुढील उपचारांसाठी आरोग्य केंद्रात पाठवणे.
अनौपचारिक पूर्व-प्राथमिक शिक्षण
३ ते ६ वयोगटातील मुलांना खेळांद्वारे आणि मनोरंजक कृतींद्वारे पूर्व-प्राथमिक शिक्षण देतात.
पोषण आणि आरोग्य शिक्षण
१५ ते ४५ वयोगटातील महिलांना त्यांच्या आणि मुलांच्या आरोग्याबद्दल आणि पोषणाबद्दल माहिती देणे.
समुदाय सहभाग
स्थानिक आरोग्य आणि स्वच्छता कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेतात.
घरोघरी भेटी
कुटुंबांना भेट देऊन आरोग्य, स्वच्छता आणि योग्य पोषणाचे महत्त्व पटवून देतात.
गरोदर आणि स्तनदा मातांची काळजी
गरोदर मातांची नोंदणी करतात, त्यांना पूरक आहार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देतात.
वर्ष २०२५-२०२६
अ.क्र | अंगणवाडी केंद्राचे नाव | अंगणवाडी सेविका | मो.नं. | 0 - ६ एकूण लाभार्थीं | फोटो |
---|---|---|---|---|---|
१ | वडाळी नजिक क्र. १ | श्रीमती मालती अनिल मोगरे | ९५५२१३८४७२ | ६७ | ![]() |
२ | वडाळी नजिक क्र. २ | श्रीमती निर्मला सुरेश गांगुर्डे | ७७४१९८४८४३ | ७५ | ![]() |
३ | वडाळी नजिक क्र. ३ | श्रीमती सोनाली भाऊसाहेब कोरडे | ९०११७२४८२५ | ६२ | ![]() |
अ.क्र | अंगणवाडी केंद्राचे नाव | अंगणवाडी मदतनीस | मो.नं. | फोटो |
---|---|---|---|---|
१ | वडाळी नजिक क्र. १ | श्रीमती जयश्री निवृत्ती गांगुर्डे | ९१३०८२०७१० | ![]() |
२ | वडाळी नजिक क्र. २ | श्रीमती गायत्री सागर वाघ | ९९२१९२४६०२ | ![]() |
३ | वडाळी नजिक क्र. ३ | श्रीमती काजल अमोल फटांगडे | ७२१८९६२४७१ | ![]() |